मित्र कसे मिळवावेत
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. या जगात जगणे ही कला आहे. आपले स्वभाव सर्वांशी जुळणे हे फार महत्वाचे आहे.
त्यासाठी उत्तम संभाषणकला अवगत हवी. ती नैसर्गिकही असायला हवी. तसेच मन विशाल व सहृदयी असले तर मित्र मिळवणे सहज सुलभ होते. मनाची विशालता व ज्ञान घेण्याची इच्छा माणसाला मित्र मिळवण्यास प्रवृत्त करते. जग हा विशाल ज्ञानाचा सागर आहे. माणसाने परिचय करून घेण्याची कलाही अवगत करायला हवी. दोघानाही आवडीचे किंवा जरुरीचे वाटणारया विषयावर बोलणे, आपुलकीने विचारणा करणे, एकमेकांच्या सुखदुखात सामील होणे व एकमेकाचे आस्थेने नेहमी, अधून मधून विचारपूस केली तर प्रेम वृद्धिंगत होते. तसेच फोनवर, इमेलने किंवा पत्र पाठवून विचारपूस केली तर ते टिकून राहते. एकमेकाला मदत करणे, वेळेला धावून येणे यामुळे विश्वास वाढतो. या जगात सर्वात मोठे व किंमत असणारे प्रेम हे वाटूनच मोठे होते व कधी संपतच नाही. जीवन जगताना हे नेहमी लक्षात ठेवायला हवे की हे जीवन दोन दिवसाचे आहे ते जाणून घ्यावे, दुसारयालाही समजावे, सर्वांना जगू द्यावे व आपणही जगावे. म्हणजे दुक्खाला जागाच उरणार नाही.
मित्र मिळवण्यासाठी वरील सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. तसेच वेळ, जागा, परिस्थिती व समोरील व्यक्तीच्या भावना, बंधनं, पात्रता, परिस्थितीचा विचार व भान ठेवून संबंध जुळवायला हवेत. थोडक्यात वेव्ह लाईन जुळायला हवी. समोरच्या व्यक्तीला तुमची छबी हवीशी वाटायला हवी. नशिबाची साथही हवी. खूप वाचन हवे. संभाषणकला जशी तशी मित्र जुळवणे ही कला आहे.
मुख्य म्हणजे संगत चांगली हवी. व्यसनाधीन माणसाला तशे मित्र मिळतील पण ते व्यसनामुळे. खरे व प्रामाणिक व चांगले मित्र असणे ही ईश्वराची देणगीच म्हणावे लागेल.
श्री.ज. गोसावी. पुणे, १४.१.२०११